Tuesday, 21 February 2012

माझाच मी उरलो तसा
श्वासात प्राण उरतो जसा


आयुष्य एक साद घाली
जाती विरून रेशीम नाती
आसक्त मी उरलो तसा
कोषात गंध उरतो जसा


मी नव्हे कि चिंब तारे
मी नव्हे कि बिंब माझे
वाहून मी उरलो तसा
मातीत थेंब उरतो जसा


आनंद मी माझा जरासा
मीच माझा घाव जरासा
स्मरणात मी उरलो तसा
पाण्यात रंग उरतो जसा......

No comments:

Post a Comment