Thursday, 13 April 2017

मी आणि माझ्यातला तू

जसा क्षितिजावरी उमटणारा केशरी रंग
जसा राधेला लाभलेला कन्ह्याचा संग

मी आणि माझ्यातला तू

जसा उषःकाली साचलेला पर्ण - दवबिंदू
जसा अंतरीच्या कोंदणातील प्रेमाचा सिंधू

मी आणि माझ्यातला तू

जशी सांजवेळी भासणारी काजळाची रेघ
जसा आसमंती बरसणारा श्रावणाचा मेघ

मी आणि माझ्यातला तू 

जशी डोंगराच्या पायथ्याशी हरवलेली वाट
जशी माघ मासी शहारलेली चांदण्यांची रात

मी आणि माझ्यातला तू ....

No comments:

Post a Comment