जोडून व्यर्थ नाती बेचैन श्वास झाला
येता क्षणैक डोळा तो थेंब आसवाचा...
जाणीव ती जळाली होवून सांजवाती
आभास बोचले ते येवून चांदराती...
ओसाड माळरानी कोठून गंध आला?
गंधात गुंतताना कोणी निघून गेला...
का एकले पणाची हुरहूर काळजाला?
जोडून व्यर्थ नाती बेचैन श्वास झाला...
No comments:
Post a Comment